व्हॉट्सअँप ग्रुप येथे क्लिक करा

तालुका निहाय पिक विमा रक्कम जाहीर यादीत आपले नाव पहा | Pikvima list 2024

Pikvima list 2024 पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील महत्त्वाच्या विविध पिकांसाठीचे विमा कवच आणि विमा हप्ता कृषी विभागाने जाहीर केला आहे.

यामध्ये शेतकऱ्यांना केवळ एक रुपयामध्ये पीकविमा काढता येणार आहे. यामध्ये सर्वाधिक विमा कवच भाताला प्रतिहेक्टरी ५१ हजार ७६० रुपये निश्चित करण्यात आला आहे. त्याखालोखाल सोयाबीनला प्रति हेक्टरी ४९ हजार रुपये निश्चित करण्यात आला आहे

राज्य शासनाने सुरू असलेल्या खरीप हंगामात केवळ १ रुपया भरून पीकविम्याचा लाभ देण्याकरिता ‘सर्वसमावेशक पीकविमा योजना’ राबविण्यास मान्यता दिली असून, शेतकऱ्यांनी १५ जुलैपर्यंत नोंदणी करून योजनेत सहभाग घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’योजनेसाठी अर्ज दिनांक 01 जुलै ते 15 जुलै 2024 पर्यंत स्वीकारले जाणार ! पात्र अपात्र कोण पहा

केंद्र शासनाकडून पंतप्रधान पीकविमा योजनेच्या निर्गमित होणाऱ्या मार्गदर्शक सूचनेनुसार खरीप हंगाम २०२३-२४ ते रब्बी हंगाम २०२५-२६ करिता ‘सर्वसमावेशक पीकविमा योजना’ (कप अॅण्ड कॅप मॉडेल ८०:११०) राबविण्यास राज्य शासनाने २६ जून २०२३ रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता दिली आहे pikvima list 2024

नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगासारख्या अकल्पित प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे. पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे.

नमो शेतकरी योजनेचे ४००० रुपये या दिवशी खात्यात जमा होणार | Namo Shetkari Yojana

नावीन्यपूर्ण व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान व सामग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे, कृषी क्षेत्रासाठीच्या पतपुरवठ्यात सातत्य राखणे, जेणेकरून उत्पादनातील जोखमींपासून शेतकऱ्यांच्या संरक्षणाबरोबरच अन्नसुरक्षा पिकांचे विविधीकरण आणि कृषी क्षेत्राचा गतिमान विकास व स्पर्धात्मकतेत वाढीचा हेतू साध्य होण्यास मदत होईल, आदी या योजनेची उद्दिष्ट्ये आहेत.

योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये

ही योजना अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील केवळ अधिसूचित पिकांसाठी तसेच ऐच्छिक आहे.

खातेदाराच्या व्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरीही या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. या योजनेअंतर्गत सर्व पिकांसाठी ७० टक्के जोखीमस्तर निश्चित करण्यात आला आहे.

महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Close Help dada

Scroll to Top