व्हॉट्सअँप ग्रुप येथे क्लिक करा

आरटीई अंतर्गत प्रवेश अर्ज भरण्यासाठी १० मे पर्यंत मुदत पालकांनी आपल्या मुलांचा अर्ज लवकर करावा | RTE Admission 2024

RTE Admission 2024:आरटीई अंतर्गत राखीव २५ टक्के जागांवर प्रवेश घेण्यासाठी सुरू असलेल्या प्रवेश प्रक्रियेत

ऑनलाइन प्रवेश अर्ज दखल करण्यासाठी १० मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

मागील पंधरा दिवसात पोर्टलवर केवळ ७०२ अर्ज दाखल झाले आहेत.

शिक्षणाचा अधिकार

आरटीई अंतर्गत प्रवेश प्रक्रियेला यावर्षी पालकांकडून मिळणारा प्रतिसाद मंदावला आहे.

यामुळे ऑनलाइन पोर्टलवर अर्ज भरण्याकडे विद्यार्थ्यांच्या पालकांनी फिरविल्याचे आहे. पाठ बोलले जात

आरटीईचे प्रवेश अर्ज भरण्यास १६ एप्रिलपासून सुविधा देण्यात आली आहे. उपलब्ध करून

३० एप्रिलपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याची सूचना देण्यात आली होती.

या मुदतीत जिल्हयातील पालकांनी केवळ ७०२ पाल्यांचे ऑनलाइन अर्ज दाखल केले आहेत.

त्यानंतर शिक्षण विभागामार्फत ही मुदत वाढविण्यात आली आहे. आता पालकांना १० मेपर्यंत ऑनलाइन अर्ज दाखल करता येणार आहेत.

मात्र, पालकांचा या प्रवेश प्रक्रियेला मिळत असलेला प्रतिसाद कमी

असल्याने यावर्षी जागांच्या तुलनेत दाखल अर्जाचे प्रमाणही कमी राहण्याची शक्यता आहे. आरटीई मध्ये शासकीय आणि

अनुदानित शाळांचा समावेश केल्याचा

हा परिणाम आहे.पालकांनी यानिर्णयामुळे मात्र नाराजी व्यक्त केली आहे.

शासनाने या निर्णयाबाबत फेरविचार करावा अशी मागणी धुळे जिल्ह्यातील पालकवर्गातून जोर धरून आहे.

त्यांनी आपले गाऱ्हाणे लोकप्रतिनिधींकडेही मांडले आहे.

महत्त्वाची माहिती येथे क्लिक करून पहा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Close Help dada

Scroll to Top